Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा ५ लाखांचा २५ टन तांदूळ...

अहमदनगर ब्रेकिंग: काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा ५ लाखांचा २५ टन तांदूळ जप्त

Ahmednagar, Rahuri  Raid News:  काळ्या बाजारात (Black Market)  विक्रीस जाणारा २५ टन तांदूळ जप्त. राहुरी पोलिसांचा छापा, ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त (Seized), दोघांवर गुन्हा दाखल.

Raid 25 tons of ration rice worth 5 lakhs seized

राहुरी: सुमारे पाच लाख रुपये किमतीचा तांदूळ  काळा बाजारात विक्री करण्यासाठी जात असताना राहुरी पोलिसांनी छापा (Raid) टाकून सदर तांदूळ व एक ट्रक (क्र.एमएच 16 सीसी 4511) असा सुमारे 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे. याबाबत राहुरी पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान राहुरी पोलिसांना गुप्त खबर्‍या मार्फत खबर मिळाल्याने राहुरी पोलिस पोलिस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा, पोलिस नाईक सचिन ताजणे, नदीम शेख, शशिकांत वाघमारे आदि पोलिस पथकाने राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा दरम्यान सदर ट्रकचा पाठलाग करून ट्रक पकडला. ट्रकमधील चालक व वाहकाकडे चौकशी केली असता ट्रकमध्ये रेशनचा तांदुळ असल्याची शंका पोलीसांना आली.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

त्यावेळी पोलिस पथकाने 5 लाख 4 हजार रूपये किंमतींचा सुमारे 25 टन तांदूळ व 30 लाख रूपये किंमतीचा मालट्रक  असा एकूण सुमारे 35 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त  करून राहुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आला. याप्रकरणी पोलिस नाईक सचिन ताजणे यांच्या फिर्यादीवरुन देवळाली प्रवरा  येथील सुनिल चांगदेव गल्हे, वय 43 वर्षे, तसेच ट्रक चालक उध्दव अर्जुन खाडे, वय 43 वर्षे, राहणार दरखवाडी, ता. जामखेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raid 25 tons of ration rice worth 5 lakhs seized

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here