Home अहिल्यानगर अहिल्यानगर: कॅफे शॉपवर छापा

अहिल्यानगर: कॅफे शॉपवर छापा

Breaking News | Ahilyanagar Crime: डॉक्टर कॉलनीत सुरू असलेल्या कॅफे शॉपवर छापा टाकत साहित्य जप्त.

Raid on the cafe shop

अहिल्यानगर : शहरातील बुरुडगाव येथील डॉक्टर कॉलनीत सुरू असलेल्या कॅफे शॉपवर छापा टाकत साहित्य जप्त केले. याप्रकरणी कॅफे चालक मंगेश भारत अजबे (रा. लांभरवाडी, ता. जामखेड) याच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बुरुडगाव येथील डॉक्टर कॉलनीत अजबे याने कोणतीही परवानगी न घेता कॅफे शॉप चालवित आहे, अशी माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती.

त्यानुसार कोतवाली पोलिसांनी कॅफेवर छापा टाकला असता तिथे कोणत्याही प्रकारचे पेय अथवा कॉफी विक्री केली जात नसल्याचे निदर्शनास आले. कोणतेही खाद्यपदार्थ न विकता अंधारात प्लायवूड लावून मुला-मुलींना बसण्यासाठी जागा उपलब्ध केल्याचे दिसले.

तसेच भगत हा कॅफे चालविताना मिळून आला असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Breaking News: Raid on the cafe shop

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here