अहमदनगर जिल्ह्यासाठी पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज
Ahmednagar News: 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत नगर जिल्ह्यात चांगला पाऊस. (Panjab Rao Dakh for Ahmednagar )
राहता: 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत नगर जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल. ज्या वर्षी पुर्वेकडून पाऊस येतो, त्यावेळी उत्तर महाराष्ट्रात उशीरा पाऊस पडतो. परतीचा पाऊस चांगला होतो, उशीरा 24 जूनला आलेला पाऊस 24 आक्टोबर ला जाईल. असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील अस्तगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात पंजाबराव डख बोलत होते. येत्या तीन महिन्याचा अंदाज व्यक्त करताना डख म्हणाले, 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालखंडात पाऊस पडेल. 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर, 15 आक्टोबर ते 30 आक्टोबर या कालखंडात पाऊस पडेल. यंदा दिवाळीतही पाऊस पडण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. थंडी 26 आक्टोबर पासुन पडेल.
जून मध्ये देशातील अनेक तज्ञांनी दुष्काळ पडेल असे सांगितले होते. मात्र परिस्थीत वेगळीच झाली. 35 राज्यापैकी 28 राज्यांत 13 टक्के जास्त पाऊस झाला. म्हणजे यावर्षी दुष्काळी परिस्थीती राहाणार नसल्याचे भाकितही त्यांनी व्यक्त केले. शेतकर्यांनी घाबरून जावु नये. कमी दिवसात जास्त पाऊस होईल, तळे भरुन जातील. पावसाचा अंदाज शेतकरीही वर्तवू शकतात हे सांगताने ते म्हणाले, गेल्या 5 वर्षापासुन पाऊस 7 जून ला सुरु होणारा पाऊस 22 दिवस पुढे सरकला आहे. त्यामुळे थंडीही 22 दिवस पुढे ढकलली. उन्हाळ्याची हीच स्थिती. 7 जून मध्ये 22 मिळविले की, तुमची पेरणी 28 जून च्या पुढे होईल. हे कायमचे लक्षात घ्या, महाराष्ट्रात 10 ते 15 जुलै दरम्यान चांगला पाऊस पडतो. व 27, 28 जून ला देखील पाऊस पडला. 18 व 19 जूलैला महाराष्ट्रात दरवर्षी 80 टक्के गावात पाऊस पडतो. सप्टेंबरात 16 ते 19 या तारखांनाही चांगला पाऊस होतो. 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर या दरम्यान अवकाळी पाऊस पडतो.
मागील चार वर्षात नगर जिल्ह्यात संगमनेर भागात चांगला पाऊस पडला तो पुर्वेकडील पावसामुळे, यावर्षीही पुर्वेकडूनच पाऊस आहे. आणखी अडीच महिने पाऊस आहे. त्यामुळे अडीच महिन्यात भरपाई निघून जाणार आहे.
Web Title: Rainfall Forecast of Panjab Rao Dakh for Ahmednagar
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App