Home अकोले अकोले ब्रेकिंग: भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात

अकोले ब्रेकिंग: भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात

Akole News:  भंडारदरा पाणलोटात काल दुपारपासून पावसास (Rain)सुरूवात झाल्याने पाणलोटात दिलासा.

Rain begins in Bhandardara catchment area

भंडारदरा | Bhandardara:  उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात काल दुपारपासून पावसास सुरूवात झाल्याने पाणलोटात दिलासा मिळाला आहे. उष्माने हैराण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

गत काही दिवसांपासून पाणलोटात कमालीचा उष्मा वाढला होता. पण काल बुधवारी दुपारी अचानक नूर पालटला. काळ्या ढगांनी गर्दी केली आणि पाऊस रिमझीम बरसू लागला. कधी हलकासा तर अधूनमधून काहीशा सरी जोरात बरसत होत्या. काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत भंडारदरात पडलेला पाऊस 9 मिमी नोंदवला गेला आहे.

पाणलोटातील घाटघर, पांजरे, रतनवाडीतही रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू होता. तेथे पडलेल्या पावसाची आकडेवारी आज हाती येईल.

पहिल्यांदाच पाऊस सुरू असल्याने हा मान्सूनपूर्व की मान्सून या संभ्रमात शेतकरी आहेत. पाऊस पडता झाल्याने पाणलोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Rain Begins in Bhandardara catchment area

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here