Home महाराष्ट्र राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात चार आरोपींना अटक; अभिनेत्रीवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात चार आरोपींना अटक; अभिनेत्रीवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप

Raj Kundra Pornography Case four arrested celebrity rape

Raj Kundra Pornography Case: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणातील फरार असलेले चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.  यामधील एक जण कास्टिंग डायरेक्टर असल्याची माहिती मिळाली.  पोर्नोग्राफी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी महाराष्ट्राबाहेर पसार झाले होते. ते गोवा आणि शिमला येथे लपून बसले होते. यामधील एक आरोपी कास्टिंग डायरेक्टर नरेश रामावतार पाल हा वर्सोवा इथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

नरेश रामावतार पाल  याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्य तीन आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींवर एका वेब सीरीझच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्रीवर बलात्कार (rape) केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपी असलेले राज कुंद्रा आणि अभिनेत्री गहना वशिष्ठ  हे सध्या जामीनावर बाहेर आहेत.

आरोपी सय्यद सैय्यद आणि अब्दुल सई यांना गोरेगाव आणि अमन बरनवार याला बोरीवलीमधून अटक करण्यात आली. माहितीनुसार  कास्टिंग डायरेक्टर नरेश पाल अभिनेत्रींकडून जबरदस्ती पॉर्न फिल्म शूट करून घेऊन त्यांना २००० हजार मानधन देत असे. या कामात बाकी तीन आरोपी त्याला मदत करत होते.

Web Title: Raj Kundra Pornography Case four arrested celebrity rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here