Home अहमदनगर नगर पंचायत समितीचे माजी सदस्य याच्यावर बलात्काराचा गुन्हा

नगर पंचायत समितीचे माजी सदस्य याच्यावर बलात्काराचा गुन्हा

Rape case against former member of Nagar Panchayat Samiti

अहमदनगर |Rape Case| Ahmednagar:  नगर तालुक्याच्या राजकारणात बलात्काराच्या गुन्ह्याने खळबळ उडाली आहे. नगर पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद अण्णा मोकाटे (रा. इमामपूर, ता. नगर) यांच्याविरुद्ध शनिवारी (ता.4) तोफखाना पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या एका विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. यामुळे नगर तालुक्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मोकाटे यांनी 2018 मध्ये फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. नंतर मेसेज करून भेटायचे असल्याचे सांगितले. वारंवर सोशल मिडियावर मेसेज करत असे. एक दिवस घरी आले. महिलेच्या एका नातेवाईकाकडे फिजिओथेरपी घेण्याच्या बहाण्याने वेळोवेळी उपनगरात असत. एक दिवस महिलेचे पती घरी नसल्याची संधी साधून मोकाटे याने बलात्कार (Rape) केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर पतीला व मुलांना ठार मारून टाकण्याची धमकी दिली. या महिलेने नकार दिला असता, तिच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी ही दिली.

त्यानंतर मी एका ओळखीच्या सामाजिक कार्यकर्त्याकडे मदतीसाठी याचना केली.सामाजिक कार्यकर्त्याने महिलेला पोलिस ठाण्यात आणले. तोफखाना पोलिसांनी मोकाटेविरुद्ध बलात्कार करणे, जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे हे करीत आहेत. या गुन्ह्याची माहिती झाल्यानंतर आरोपी मोकाटे हा फरार झाला आहे.

Web Title: Rape case against former member of Nagar Panchayat Samiti

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here