धक्कादायक! खाऊचे आमिष दाखवत शेजारी राहणाऱ्या नराधमाने तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
Rape case: ४२ वर्षीय नराधमाने शेजारी राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींवर एकाच दिवशी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई: दक्षिण मुंबईत ४२ वर्षीय नराधमाने शेजारी राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींवर एकाच दिवशी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने तीन मुलींना नूडल्सचं आमिष दाखवून आपल्या घरात नेले व त्यांच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पीडित मुलींच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली असून त्याला ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पीडित मुलींच्या आईने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी त्यांच्या शेजारी राहतो त्याने तीन मुलींना खाऊचे आमिष दाखवून आपल्या घरी नेलं. तिन्ही मुलींना घरात घेऊन त्याने दरवाजा बंद केला व त्यांच्यावर अत्याचार केला. काही वेळानंतर मुली आरोपीच्या घरातून बाहेर आल्या व त्यांनी रडत रडत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. हे ऐकून आईला धक्का बसला व तिने जे जे मार्ग पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच जे. जे. पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींविरुद्ध आयपीसी कलम३७६, ३६७ (ब), ३७७, ३४१ आणि पॉक्सो कलम ४,५ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Web Title: Rape Case Three minor girls were molested by the killers living in the neighborhood
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App