Home महाराष्ट्र Rape Case: गतीमंद मुलीवर बलात्कार, नरखेडमधील नराधमाला…

Rape Case: गतीमंद मुलीवर बलात्कार, नरखेडमधील नराधमाला…

Rape of a speeding girl, in Narakhed

Nagpur | नागपूर: अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार (Rape) करणाऱ्या नरखेड तालुक्यातील नराधम आरोपीस २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच एकूण ३० हजार रुपये दंड ठोठाविला आहे. विशेष सत्र न्यायालयाने मंगळवारी हा निर्णय दिला.

आशिष रुपराव नेवले वय ३८ असे आरोपीचे नाव आहे. सदर घटना ५ ऑक्टोबर २०२८ रोजी दुपारी २ वाजता मोवाड येथे घडली. पिडीत मुलगी ही १५ वर्षाची होती. घटनेच्या दिवशी तिचे आई वडील शेत कामाला तर दोन भाऊ शाळेत गेले होते. मुलगी घरात एकटीच होती. आरोपी घरात शिरला व दार बंद करून त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केला. त्यावेळी मुलीचा भाऊ शाळेतून घरी आला असता आरोपी बाहेर निघून गेला. भावाने शेतात जाऊन आई वडिलांना बोलावून आणून विचारपूस केल्याने मुलीने आरोपीच्या कृत्याची माहिती दिली. आईने आरोपीविरुद्ध नरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंदवून अटक केली. तसेच तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

Web Title: Rape of a speeding girl, in Narakhed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here