Home पुणे Rape | धककादायक प्रकार: बलात्कार करून महिलेची १६ लाखांची फसवणूक

Rape | धककादायक प्रकार: बलात्कार करून महिलेची १६ लाखांची फसवणूक

Rs 16 lakh cheated from a woman by rape

पिंपरी चिंचवड: शादी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल साईटवरून विवाहासाठी रिक्वेस्ट पाठवून नंतर लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार (rape) केल्याची घटना समोर आली आहे. तिच्याकडून १६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक देखील करण्यात आली. सुसगाव आणि तुळजापूर येथे १५ मार्च २०१८ ते १४ मे २०२२ या कालावधीत घडला.

गिरीश भीमराव भोसले (वय ३९, रा. उस्मानाबाद. मूळ रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला शादी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल साईटवरून विवाहासाठी रिक्वेस्ट पाठवली. आरोपीने तो स्वतः विवाहित आहे, हे फिर्यादीपासून लपवून ठेवले. फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. महिलेचा विश्वास संपादन करून वेळोवेळी १६ लाख १० हजार रुपये घेतले. ते पैसे परत न देता महिलेची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Rs 16 lakh cheated from a woman by rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here