बर्निंग बसचा थरार..! प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसने अचानक घेतला पेट
Pune Bus Fire News : धावत्या बसने पेट घेतल्याची धक्कादायक घटना.
पुणे: पुण्यात बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे – सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलच्या समोर धावत्या बसने पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे संपूर्ण नुकसान झाले आहे. संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. बसमध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते.
भीषण आगीची ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे .या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस हैदराबाद वरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बस मध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करीत होते. सर्वजण सुखरूप आहेत.
या आगीत बसचे मोठ्या प्रमाणावर पूर्ण नुकसान झाले असून पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या वेळी महामार्ग दोन्ही बाजुंनी बंद ठेवण्यात आला होता. कदम वस्ती ग्रामपंचायत या ठिकाणी गाडीचा टायर फुटला त्यानंतर गाडीने पेट घेतला. या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले असून पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
Web Title: running bus full of passengers suddenly caught fire
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study