अकोलेत चंदन तस्करी पती फरार; पत्नी ताब्यात
Akole Crime: वनविभागाच्या हद्दीतील चंदनाची झाडे तोडून तस्करीचा प्रयत्न करणाऱ्या गावातीलच एका दाम्पत्यास वन कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना.
अकोले : तालुक्यातील कळंब गावाच्या वनविभागाच्या हद्दीतील चंदनाची झाडे तोडून तस्करीचा प्रयत्न करणाऱ्या गावातीलच एका दाम्पत्यास वन कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली आहे. यावेळी त्यांच्याकडून चंदनाचा गाभा व साहित्य ताब्यात घेण्यात आले असून, यातील आरोपी पती पसार झाला असून पत्नीला वन विभागाने ताब्यात घेतले आहे. वन विभागाने पती पत्नी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खोऱ्यातील कळंब मुळा परिसरातील वनविभागाच्या हद्दीत चंदन तस्करी सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांना खबऱ्यामार्फत मिळाली. यावेळी वनविभागाने स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ आहे. कळंब येथील वनविभागाच्या हद्दीत चंदनाची झाडे तोडणाऱ्या कळंब गावातीलच गोविंद गुलाब पिंपळे आणि काजल गोविंद पिंपळे या दाम्पत्याला पाहिले. मात्र, गोविंद पिंपळे हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देऊन फरार झाला आहे.
वन कर्मचाऱ्यांनी काजल पिंपळे हिला ताब्यात घेतले व परिसरात पाहणी केली असता वनविभागाच्या अधिकाऱ्याना चंदनाची चार झाडे तोडली असल्याचे आढळून आले. तसेच घटनास्थळी चंदनाच्या आतील दहा हजार रुपये किमतीचा गाभा हस्तगत करण्यात आला आहे.
गोविंद पिंपळे हा आरोपी घटनास्थळावरून आपल्या पत्नीला जागेवरच सोडून पसार झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचा पंचनामा केला. वनविभागाने गोविंद गुलाब पिंपळे, काजल गोविंद पिंपळे दोघे (राण कळंब) यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९९७ चे कलम २६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनपाल एस. बी. शिर्के, विठ्ठल पारधी, वनरक्षक सुनील कुक्कुडवाल, घेतला सुनीता टेम्बरे, वन कर्मचारी बाळासाहेब हांडे, गोविंद भोर, सागर गोंदके, शिवाजी लांडगे, निखिल गवांदे, रंगनाथ कड्डू, माधव भांगरे यांनी सदर कारवाई केली आहे.
Web Title: sandalwood smuggling husband absconding
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App