Home महाराष्ट्र धककादायक! एकाच कुटुंबातील ९ जणांची सामुहिक आत्महत्या | Suicide

धककादायक! एकाच कुटुंबातील ९ जणांची सामुहिक आत्महत्या | Suicide

Sangali family Suicide

Sangali | सांगली: सांगलीमधील मिरज येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांनी सामुहिक आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या मागील कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये रविवारी रात्री एकाच कुटुंबातील ९ जणांनी आपले जीवन संपविले आहे. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावांनी आपल्या कुटुंबासमवेत आत्महत्या केली आहे. यामध्ये आई. पत्नी, मुलांचादेखील समावेश आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

Web Title: Sangali family Suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here