Home क्राईम संगमनेर: पोलीसाच्या दोन दुचाकी जाळल्या – Burn

संगमनेर: पोलीसाच्या दोन दुचाकी जाळल्या – Burn

Sangamner Burn Two Motarcycle:  पोलिसाचीच वाहने जाळल्याने संगमनेर शहर पोलीस आता याचा कसा तपास लावणार हे पहावे लागणार.

Sangamner Burn Two Motarcycle of police

संगमनेर:  संगमनेर शहरात दुचाकी चोरीबरोबरच आता दुचाकी गाड्या जाळण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहे. गुन्हेगारांची हिम्मत वाढली असून सर्वसामान्यांबरोब पोलीसांची वाहने देखील पेटवून दिली जात आहे. संगमनेर शहरालगत असणाऱ्या उपनगरात एका पोलिसाच्या दोन दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला असून शहर पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली आहे.

यापूर्वीही संगमनेर शहरात तीन चार ठिकाणी वाहने – जाळण्याचे प्रकार झाले. या जाळपोळीमध्ये अद्याप पर्यंत पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत. आता पोलिसाचीच वाहने जाळल्याने संगमनेर शहर पोलीस आता याचा कसा तपास लावणार हे पहावे लागणार आहे. सध्या पोलीस मुख्यालय ठाणे ग्रामीण येथे पोलीस नाईक या पदावर नेमणुकीस असलेले राजेश सावित्रा माळी (रा. ढोलेवाडी, माधवनगर) यांच्या दोन दुचाकी अज्ञातांनी रात्री जाळून टाकल्या.

राजेश माळी यांनी यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माळी हे सध्या भातसा धरण या ठिकाणी गार्ड ड्युटी वर तैनात आहेत. त्यांचे कुटुंबीय ढोलेवाडी माधवनगर संगमनेर येथे राहत आहेत. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दोन्ही मोटरसायकल्स घरासमोर उभ्या करून घरातील सर्व लोक झोपी गेले असता पहाटे दोन वाजण्याचा सुमारास त्यांच्या मुलीला जाग आल्याने तिला घरासमोर लावलेल्या मोटारसायकली जळत असल्याच्या दिसल्या. तेव्हा माळी यांनी फोन करून पोलीस व अग्निशामक बोलावले. यामध्ये हिरव्या रंगाची होंडा कंपनीची अॅक्टिवा क्रमांक एमएच १७ सीएच ६७६५ आणि लाल रंगाची हिरो कंपनीची दुचाकी क्रमांक एम. एच. १७ एएक्स ६९०४ अशा दोन्ही गाड्या या घटनेत जळून खाक झाल्या. माळी यांनी फिर्याद दिल्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला.

Web Title: Sangamner Burn Two Motarcycle of police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here