Home क्राईम संगमनेरातील घटना: पैसे हडप करण्यासाठी बनाव,  फिर्यादीच निघाला आरोपी

संगमनेरातील घटना: पैसे हडप करण्यासाठी बनाव,  फिर्यादीच निघाला आरोपी

Sangamner Crime accused went on a rampage to extort money

संगमनेर | Sangamner Crime: नेवासे येथे स्टील खाली करुन परतीच्या वाटेवर असणारे वाहन संगमनेर-लोणी रस्त्यावरील कोंची मांची घाटात मोटारसायकलहून आलेल्या दरोडेखोरांनी अडवत वाहनचालकाच्या ताब्यातील ३ लाख ६६ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली.

सदरच्या गुन्ह्यात रोख रक्कम लांबविण्यासाठी फिर्यादीनेच दरोड्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.  अवघ्या १२ तासांत संगमनेर तालुका पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत रोख रकमेसह एक स्विप्ट कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की,  सोहेल याकूब शेख (वय २९, रा. एकतानगर, संगमनेर) हा त्यांच्या ताब्यातील वाहनातून नेव से येथे स्टील खाली करण्यासाठी गेला होता. तो स्टील खाली करून ३ लाख ६६ हजार ५० रुपयांची रोकड घेवून नेवासा फाटा येथून संगमनेरकडे परतीच्या वाटेवर निघाला. दरम्यान श्रीरामपूर येथे आल्यानंतर त्याच्या वाहनाचा अज्ञात दोन इसमांनी मोटारसायकलहून पाठलाग सुरु केला. मोरगे वस्ती श्रीरामपूर येथून आणखी दोन इसम मोटारसायकलहून पाठलाग करू लागले.

दरम्यान संगमनेर-लोणी रस्त्यावरील कोंची मांची घाटात आल्यानंतर सदर दोन्ही पल्सर मोटारसायकल धारकांनी त्यांची वाहने शेख यांच्या वाहनाला आडवी लावली. काही एक न बोलता त्यांनी शेख यास मारहाण करण्यास सुरुवात केली. तर वाहनातील ड्रावरमध्ये ठेवलेले ३ लाख ६६ हजार ५०० रुपयांची रोकड काढून घेत ते पसार झाले. याबाबतची फिर्याद सोहेल याकूब शेख याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १२२/२०२२ भारतीय दंड संहिता ३९४, ३४ प्रमाणे दाखल केला.

सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व त्यांचे कर्मचारी व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने लागलीच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी तपासाबाबत सूचना देवून दोन पथके तयार करुन तपास कामी रवाना केले.

सदर गुन्ह्याचा तपास करतांना तांत्रिक तपासावरुन सदरचा गुन्हा हा घडलेला नसून फिर्यादीने पैसे हडप करण्यासाठी बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी सोहेल शेख याच्याकडे कसुन चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार समीर याकुब शेख (वय २४, वर्ष रा. एकता नगर, संगमनेर जि. अहमदनगर), सैफअली शेरअली शेख (वय २५, वर्ष रा. नाईकवाडपुरा संगमनेर) यांचेशी संगनमताने  सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे.

Web Title: Sangamner Crime accused went on a rampage to extort money

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here