Home क्राईम संगमनेर: कॅफेमध्ये मुलीसोबत बसलेल्या तरुणाला बेदम मारहाण

संगमनेर: कॅफेमध्ये मुलीसोबत बसलेल्या तरुणाला बेदम मारहाण

Sangamner Crime:  तरुणीला पळूवन आणल्याच्या संशया वरून येथील एका युवकास बेदम मारहाण झाल्याची घटना.

Sangamner Crime young man sitting with a girl in a cafe was brutally beaten

संगमनेर:  तरुणीला पळूवन आणल्याच्या संशया वरून येथील एका युवकास बेदम मारहाण झाल्याची घटना काल दुपारी तालुक्यातील खांजापूर परिसरात घडली. या घटनेत हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या युवकास मारहाण करणार्‍यांना विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. रुग्णालयासमोर नागरिकांचा जमाव एकत्र आल्याने शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, नांदूर शिंगोटे येथे राहणारी एक युवती काल संगमनेर शहरालगतच्या एका कॅफे हाऊस मध्ये तिच्या सचिन नावाच्या मित्रासोबत बसलेली होती. याचवेळी या कॅफेमध्ये सचिनचा एका समाजाचा एक मित्रही आला. हा प्रकार संशयास्पद असल्याची माहिती काही युवकांना समजली. यानंतर हे युवक या कॅफेहाऊस मध्ये आले. त्यांनी संबंधित युवकास उचलून नेले.

तालुक्यातील खांजापूर परिसरातील विठ्ठल कडा येथे नेऊन त्याला मारहाण करण्यात आली. लोखंडी गजाने मारहाण झाल्याने तो गंभीर जखमी झाला. या युवकाला या ठिकाणी तब्बल चार तास ठेवण्यात आले होते. नंतर त्याला उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती समजतात शहरातील एका समाजाच्या नागरीकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयासमोर गर्दी केली. मारहाण करणार्‍या विरुद्ध त्वरित कारवाई करावी अशी मागणी जमावाने केली. घटनेचे गांभीर्य समजतात पोलीस मोठ्या संख्येने रुग्णालयासमोर आले. याप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangamner Crime young man sitting with a girl in a cafe was brutally beaten

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here