Home Sangamner News संगमनेर: तलावात होडी उलटून मच्छीमाराचा बुडून मृत्यू

संगमनेर: तलावात होडी उलटून मच्छीमाराचा बुडून मृत्यू

angamner Fisherman dies after boat capsizes in lake

संगमनेर | Sangamner: तलावात मासेमारी करताना होडी उलटून मच्छिमार व त्याची पत्नी बुडाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील बोटा गावाअंतर्गत असलेल्या केळेवाडी येथे गुरुवारी रात्री घडली. या घटनेत पत्नी वाचली मात्र मच्छिमाराचा बुडून मृत्यू झाला. तब्बल ७२ तास मृतदेह शोधण्याचे काम सुरु होते. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी तलावात तरंगताना आढळून आला.

काशिनाथ आनंदा दुधवडे वय ४५ रा. कुरकुटवाडी ता. संगमनेर असे या मयत मच्छीमाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा रमेश दुधवडे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु  ची नोंद केली आहे.

केळेवाडी येथील तलावात संगमनेर तालुक्यातील बोटा येथील रज्जाक शेख यांनी मासेमारीसाठी लिलाव घेतला आहे. काशिनाथ व त्यांची पत्नी चीनकाबाई दुधवडे हे दोघे पती पत्नी शेख यांच्याकडे मासेमारीचे काम करीत होते. गुरवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते तलावात जाळे टाकण्यासाठी गेले असता होडी उलटल्याने हे दोघेही पाण्यात बुडाले. चीनकाबाई यांच्या हाती थर्माकाल चा पुठ्ठा लागल्याने त्याचा आधार घेऊन त्या तलावाच्या कडेला आल्या. मात्र काशिनाथ दुधवडे हे पाण्यात बुडाले. चीनकाबाईनी घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर तलावात बुडालेल्या काशिनाथ यांच्या बचावासाठी जीवरक्षक पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानाही अपयश आले. तब्बल ७२ तासानंतर मृतदेह रविवारी सकाळी साडे आठ वाजता तरंगताना आढळून आला.   

Web Title: Sangamner Fisherman dies after boat capsizes in lake

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here