Home संगमनेर संगमनेर: कर्हे घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

संगमनेर: कर्हे घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Sangamner Karhe Ghat Accident youth death 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर येथील एका अविवाहित तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे उंबरी बाळापुर परिसरात शोककळा पसरली आहे.

दीपक साहेबराव भुसाळ रा. उंबरी बाळापुर असे या मयत तरुणाचे नाव आहे. दीपक हा संगमनेर येथील एका खासगी कंपनीत कामास होता. दोन दिवसांपूर्वी कामानिमित तो नाशिकला गेला होता. काम आटोपून संगमनेरकडे येत असताना पहाटे चार वाजेच्या सुमारास कर्हे घाटात अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर उंबरी बाळापुर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दीपकच्या पश्चात आई वडील, भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने उंबरी बाळापुर येथे शोककळा पसरली आहे.

Web Title: Sangamner Karhe Ghat Accident youth death 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here