Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील सांगवी फाट्यावर दरोड्याच्या तयारीतील टोळी पोलिसांनी केली गजाआड

संगमनेर तालुक्यातील सांगवी फाट्यावर दरोड्याच्या तयारीतील टोळी पोलिसांनी केली गजाआड

Sangamner Police arrested a gang preparing for a robbery at Sangvi 

संगमनेर | Sangamner:  तालुक्यातील सांगवी फाट्यावर दरोड्याच्या तयारीतील टोळी पोलिसांनी पकडली असून  लोखंडी गज, लाकडी दांडके, मिरची पूड जप्त करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील निमगाव निमगाव बुद्रुक शिवारातील सांगवी फाटा येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला संगमनेर तालुक्यातील पोलिसांच्या पथकाने पकडले. या कारवाईत टोळीकडून लोखंडी गज, लाकडी दांडके, मिरची पूड जप्त करण्यात आली आहे सदर कारवाई गुरुवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

निमगाव बुद्रुक शिवारातील सांगवी फाटा येथे पहाटे आठ जणांची टोळी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलीस उपाधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना समजली होती. त्यानुसार सापळा लावत पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहायक फौजदार बाळासाहेब घोडे, पोलीस हवालदार संजय बडे, यांच्या पथकाने सांगवी फाटा येथे अंधारात लपून बसलेल्या पैकी तिघांना ताब्यात घेतले असून पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्याकडे एक लोखंडी गज, लाकडी दांडके, मिरची पूड, रोख रक्कम ५०० रुपये असा मुद्देमाल मिळून आला.

या टोळीतील आरोपींपैकी राहुल संजय शिरसाठ वय २४ रा. धांदरफळ खुर्द, किरण संजय काळे रा. अकलापूर, व एक अल्पवयीन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर रवी संजय शिरसाठ रा. जोर्वे, सतीश डोखे रा. धामणगाव आवारी ता. अकोले, गोरख सखाराम फोडसे रा. आकाश फोडसे, सुरेश फोडसे तिघेही  रा. धांदरफळ खुर्द हे पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी पोलीस नाईक महेंद्र सहाने यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बी.बी. घोडे करीत आहे. संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी पकडली असून ही टोळी संगमनेर व अकोले तालुक्यातील असल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Web Title: Sangamner Police arrested a gang preparing for a robbery at Sangvi 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here