संगमनेर: आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी (मालूंजे) या शाळेत पालक सहभागातून मिष्टान्न भोजन
संगमनेर: आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी (मालूंजे) या शाळेत पालक सहभागातून मिष्टान्न भोजन
राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेकडून मिळालेल्या शालेय व इतर साहित्याचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप तसेच शाळेला रोज दोन शुद्ध पाण्याचे जार देणाऱ्या दात्याचा सत्कार असा त्रिसूत्री कार्यक्रम आयोजित केला होता.
You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19
पालक सहभागातून मिष्टान्न भोजन या कार्यक्रमांतर्गत मालूंजे गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच संदिपराव घुगे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या संत्रीचे वाटप केले. याप्रसंगी सदर मिष्टान्न भोजन प्रत्येकी 15 दिवसांनी देण्याचे सर्व पालकांनी मान्य केले व वर्षभराचे मिष्टान्न भोजन योजनेचे नियोजन करण्यात आले.
राष्ट्रीय स्थायी विकास संस्था संगमनेर यांजकडून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सर्वांनीच राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images
शाळेचा कायमस्वरूपीचा असणारा पाण्याचा प्रश्न शिबलापूर येथील विजू मुंतोडे यांनी रोज शुद्ध व स्वच्छ पाण्याचे दोन जार मोफत देऊन कायमस्वरूपी सोडवल्याबद्दल सरपंच संदिप घुगे यांचे हस्ते शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.
तसेच याप्रसंगी शाळेतील माजी शिक्षिका कदम मॅडम व दिवे मॅडम यांनी शाळेला तीन खुर्च्या प्रदान करण्यात आल्या, त्यांचेही वितरण याप्रसंगी करण्यात आले.
सदर कार्यक्रमप्रसंगी सरपंच संदिपराव घुगे, व्यवस्थापन समिती अध्यक्षा मनीषा खरात, उपाध्यक्ष संदिप खरात, सदस्य मनोज खरात, दिपक खरात, दिलीप खरात, विलास नागरे, सचिन खरात,पावलस खरात,योगिता खरात, गोसावी ताई यांसह पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक केशव घुगे यांनी तर आभार श्रीमती.सुरेखा आंधळे मॅडम यांनी मांडले.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.