रविवारी संगमनेरात करोना दिलासादायक: १९ व्यक्ती बाधित
संगमनेर | Sangamner: रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात तीन तर ग्रामीण भागात १६ असे १९ करोनाबाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.
अॅटीजेन चाचणीत, खासगी प्रयोगशाळा तसेच शासकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालात मालदाड रोड येथील १८ वर्षीय तरुण, गोल्डन सिटी येथून २२ वर्षीय तरुण, नवीन नगर रोड येथे २२ वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत.
तर तालुक्यातून गुंजाळवाडी येथे ४३,७० वर्षीय महिला, ३३ वर्षीय पुरुष, आनंदवाडी येथे २४ वर्षीय पुरुष, घारगाव येथे ४० वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथे ६५ वर्षीय पुरुष, ६ वर्षीय मुलगी, शिंदोडी येथे २८ वर्षीय पुरुष.पिंप्री लौकी येथे ५० वर्षीय पुरुष, वाघापूर येथे ३१ वर्षीय महिला, घुलेवाडी येथे ४८ वर्षीय महिला, खांजापूर येथे १९ वर्षीय पुरुष, रहिमपूर येथे ५४ वर्षीय पुरुष,सुकेवाडी येथे ४८ वर्षीय महिला, जोर्वे येथे ६५ वर्षीय पुरुष, कोकणगाव येथे ३० वर्षीय पुरुष असे १९ बाधित आढळून आले आहे. हा आकडा इतर दिवसांच्या तुलनेत कमी असल्याने संगमनेरवासियांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Sangamner taluka 19 corona infected Sunday