Sangamner: संगमनेर तालुक्यात ५५ करोनाबाधितांची वाढ
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात 55 व्यक्ती करोनाबाधित आढळून आले आहेत. शहरातून 12 व्यक्ती तर ग्रामीण भागातून 43 व्यक्ती करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 2,765 वर पोहोचली आहे.
मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात पावबकी रोड येथे 50 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 11,5 वर्षीय बालिका, भारतनगर येथे 51,28 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 11 वर्षीय मुलगा, शिवाजीनगर येथे 71 वर्षीय पुरुष, महात्मा फुलेनगर येथे 33 वर्षीय महिला, गणेशनगर येथे 49, 76 वर्षीय पुरुष करोना पॉझिटिव्ह आले आहेत.
तसेच तालुक्यातून झोळे येथे 31 वर्षीय महिला, बोरबन येथील 34,33 वर्षीय पुरुष, धांदरफळ बुद्रुक येथील 16 वर्षीय मुलगा, चिंचपूर येथे 70, 52, 48,38 वर्षीय पुरुष रायतेवाडी येथे 70 वर्षीय महिला, निमज येथील 32 वर्षीय पुरुष, पेमगिरी येथे 22 वर्षीय तरुणी, संगमनेर खुर्द येथील 52 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथे 78 वर्षीय वयोवृद्ध, वडगाव पान येथील 58 वर्षीय 27, 24 वर्षीय पुरुष, माळेगाव हवेली येथे 22 वर्षीय तरुणी, गुंजाळवाडी येथे 67 , 47 वर्षीय पुरुष, 31, 25 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय पुरुष, 30,30,22 वर्षीय महिला, 3 वर्षीय बालक, आश्वी खुर्द येथील 38 वर्षीय पुरुष, शेडगाव येथील 60 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 72 वर्षीय पुरुष, सायखिंडी येथे 73 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथील 55 वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे 51 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, कासारा दुमाला येथे 29 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 67, 48, 48 वर्षीय पुरुष, देवकौठे येथे 39 वर्षीय महिला, निमगाव बुद्रुक येथे 34, 52 वर्षीय पुरुष, मंगळापुर येथील 58 वर्षीय पुरुष, खांडगाव येथे 28 वर्षीय महिला, ओझर खुर्द येथील 35 वर्षीय पुरुष असे 55 करोनाबाधित आढळून आले आहेत.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Sangamner Taluka 55 Corona infected