Home क्राईम संगमनेरात बँकेसमोर डिक्कीतून अडीच लाखाची रक्कम लांबविली

संगमनेरात बँकेसमोर डिक्कीतून अडीच लाखाची रक्कम लांबविली

Sangamner thfet of rupees in bike dikki

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील नाशिक पुणे महामार्गावरील बँक ऑफ इंडिया समोर सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मोटारसायकलच्या डिक्कीतून  लाख ६० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे.

संजय भाऊसाहेब शेजुळ रा. ओझर खुर्द तालुका संगमनेर यांनी आपला ट्रॅक्टर थोरात सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस वाहतुकीसाठी एका ठेकेदाराला भाडेतत्वावर दिलेला आहे. या ठेकेदाराने त्यांना सोमवारी दुपारी दोन लाख 60 हजार रुपयांची रक्कम घुलेवाडी येथे दिली. संजय शेजुळ हे ही रक्कम भरण्यासाठी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास शहरातील बँक ऑफ इंडिया येथे आले.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो 

सदर रक्कम त्यांनी आपल्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेली होती. उशीर झाल्याने रक्कम भरता येईल का अशी चौकशी करण्यासाठी ते बँकेत गेले असता अज्ञात चोरट्याने याच वेळेचा फायदा घेत डिक्कीतून रक्कम लांबवून त्याच्या जोडीदाराच्या दुचाकीवर बसून पसार झाला. याप्रकरणी संजय शेजूळ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Sangamner thfet of rupees in bike dikki

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here