अहमदनगर जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीला २० लाखांचा राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार

लोणी | Loni: केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय व्यवस्थापनाचा उत्कृष्ट दर्जा व गावात स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे सन 2017-18 मधील संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीला राज्यात व्दितीय क्रमांकाचा रक्कम 20 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवार दि.1 जुलै रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पध्दतीने या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली त्याचबरोबर ग्राम स्वच्छता व विविध राबविलेले सामाजिक उपक्रम यामुळे राष्ट्रीय व राज्य स्तरावर ग्रामपंचायतीला 20 लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
याबाबत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
Web Title: second award of Rs. 20 lakhs to this Gram Panchayat loni


















































