Home अहमदनगर उपचारासाठी जात असताना महिलेस मारहाण व विनयभंग

उपचारासाठी जात असताना महिलेस मारहाण व विनयभंग

Ahmednagar News Beating and molesting a woman

बोल्हेगाव | Ahmednagar News: उपचार घेण्यासाठी एक ३० वर्षीय महिला जिल्हा रुग्णालयात जात असताना तिला मारहाण व तिचा विनयभंग केल्याची घटना बोल्हेगाव परिसरात स्मशानभूमीजवळ मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गोपी सुनील आरडे रा. बोल्हेगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेच्या पोटात दु:खत असल्याने मंगळवारी रात्री त्या उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात जात असताना बोल्हेगाव स्मशानभुमीजवळ गोपी आरडे याने त्यांना अडविले. फिर्यादी महिलेला गोपी याने तोंड दाबून मारहाण केली. तसेच फिर्यादी महिलेशी गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिडीत महिलेने रात्रीच तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत आरडे विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी विनयभंग, मारहाण, शिवीगाळ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक  तपास पोलीस नाईक एच. एम. आव्हाड करीत आहे.

Web Title: Ahmednagar News Beating and molesting a woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here