सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मुंबईहून मुली पुरविल्याने दलाल महिलेला अटक
Sex racket: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग पथकाला यश आले आहे. याप्रकरणी दलाल महिलेला अटक. मुंबईच्या मुलीची सुटका.
नागपूर | Nagpur : नागपूरच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळविले. स्वतः व्यवसाय करत असलेली आणि दलाल महिलेसह एका आरोपीला अटक करण्यात आली. तर यासाठी मुंबईहून आलेल्या एका मुलीचे सुटका करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग पथकाला गुप्त माहिती मिळाली की बजाजनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये देह व्यापाराचा व्यवसाय (Prostitution Business) केला जात आहे. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला आणि देह व्यापारासाठी मुलीला घेऊन जात असलेल्या दलाल महिलेला अटक केली. तर त्या हॉटेलमध्ये आधीच जाऊन असलेल्या ग्राहकाला सुद्धा अटक करण्यात यश मिळाले आहे.
Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या
दलाल महिला ही नागपूरच्या वेगवेगळ्या भागात मुली पुरवण्याचे काम करत असल्याचे पुढे आले आहे. त्याचप्रमाणे या महिलेसह अनेक दलाल सक्रिय असल्याचे देखील पुढे आले असून पोलीस आता त्यांची पाळमूळ शोधत आहेत. या प्रकरणात देह व्यापारासाठी मुलीला मुंबईतून बोलवण्यात आले होते. ही मुलगी गेल्या आठ दिवसापासून नागपुरात असून तिची पोलिसांनी सुटका केली आहे.
Web Title: Sex racket busted Broker woman arrested for supplying girls
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App