Home पुणे साडेपाच वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर लैगिंक अत्याचार

साडेपाच वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर लैगिंक अत्याचार

Breaking News | Daund Crime: अपहरण करून साडेपाच वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली. धक्कादायक प्रकार.

Sexual harassment of a five and a half year old minor girl

कुरकुंभ: कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीतून अपहरण करून साडेपाच वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.१६) उघडकीस आला. याप्रकरणात नवनाथ रिठे (वय २७) याला पोलिसांनी अटक केली आहे. या नराधमावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत कुरकुंभ हद्दीत भागवतवस्ती येथील एका किराणा दुकानासमोरून पिडित बालिकेचे अपहरण केले. त्यानंतर बालिकेला मळद (ता. दौंड) गावच्या हद्दीत ऊसाच्या शेतात नेले. त्याठिकाणी बळजबरीने बालिकेच्या अंगावरील कपडे काढून मारहाण करीत लैंगिक अत्याचार केला. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Breaking News: Sexual harassment of a five and a half year old minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here