Home महाराष्ट्र धक्कादायक: आयआयटीच्या विद्यार्थ्याला बनविले ‘लैंगिक गुलाम’

धक्कादायक: आयआयटीच्या विद्यार्थ्याला बनविले ‘लैंगिक गुलाम’

The most brutal and shocking way of sexually assaulting him and turning him into a ‘sex slave’ was exposed.

sexually assaulting him and turning him into a 'sex slave' was exposed

मुंबई : एका समलैंगिक अॅपच्या माध्यमातून पवईतील आयआयटीच्या विद्यार्थ्याशी ओळख करून त्याच्यावर अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक अत्याचार करत त्याला ‘लैंगिक गुलाम’ बनविण्याचा अत्यंत  हिणकस आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यावर अत्याचार करणारे उच्च शिक्षित दाम्पत्य आहे. त्यांच्यावर पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कायदा, माहिती व तंत्रज्ञान, जादूटोणा कायद्यासह, अनैसर्गिक अत्याचार, हत्येचा प्रयत्न याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पवईतील क्रिस्टल टॉवरमध्ये शुभ्रो बॅनर्जी व मनश्री मुखर्जी दाम्पत्य राहते. शुभ्रोची आयआयटीतील एका ३३ वर्षीय विद्यार्थ्याशी अॅपवरून ओळख झाली. ओळखीनंतर शुभ्रोने या विद्यार्थ्याला मारहाण करत त्याच्यावर अमानुषपणे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.

 शुभ्रो हा जप, तप, मंत्र वगैरे म्हणत हातावर कापूर जाळून संबंधित विद्यार्थ्याला तांत्रिक सेक्स करायला भाग पाडायचा. जानेवारी २०२२ पर्यंत शुभ्रोने  तांत्रिक सेक्स आणि टॅरट कार्डचा वापर करून संमोहनद्वारे तो तरुणाला बेशुद्ध करायचा, अंगावर मेणबत्तीचे गरम थेंब टाकत हातावर, गळ्यात धागेदोरे बांधायचा. शुभ्रोने दुधामध्ये गुंगीचे औषध मिसळून विद्यार्थ्याच्या काही कागदपत्रांवर सह्या करून तीन फॉर्म भरून घेतले आहेत.  शुभ्रोची पत्नी मनश्री हिचीही पतीच्या कृत्यात साथ होती. तिने तरुणाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली होती.

विद्यार्थ्यांने केलेल्या तक्रारीनुसार, ९ मे २०१९ ते त्याच्याशी बळजबरीने वारंवार अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. ३ जानेवारी २०२० रोजी विद्यार्थ्यांने नकार देताच विद्यार्थ्याला मारून जमिनीवर पाडले व फरफटत पलंगावर नेऊन आपटले. तोंड दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Web Title: sexually assaulting him and turning him into a ‘sex slave’ was exposed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here