अल्पवयीन मुलीचा विनयभंग व शिवीगाळ, गुन्हा दाखल
शिर्डी: एक अल्पवयीन मुलगी घरात जात असताना तिच्या हातास धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. शिर्डी शहरातील एका उपनगरात ही अल्पवयीन मुलगी राहते. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निघोज गावातील बाळासाहेब प्रभाकर महाले यांनी तसेच एका महिलेने अल्पवयीन मुलीला पकडून उचला हे लोक फार माजले आहेत. असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.
त्याचबरोबर लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले याप्रकरणी या अल्पवयीन मुलीने शिर्डी पोलिसांत तक्रार दिली आहे. यावरून पोलिसांनी बाळासाहेब प्रभाकर महाले यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हे दाखल केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, प्रवीण दातरे, यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास उप विभागीय अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.
Web Title: Shirdi Molestation of a minor girl