विखे पाटील गट गड राखणार? साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीसाठी थोरात- कोल्हे गटाची उदय?
Shirdi sai baba sansthan karmchari society election: विखे पाटील विरोधात थोरात – कोल्हे या दोन पॅनलमध्ये निवडणूक होणार असे चित्र सध्या निर्माण झाले.
शिर्डी: कोट्यावधी रूपयांची उलाढाल असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या 20 वर्षापासून विखे पाटील गटाची सत्ता असलेल्या सोसायटीत यावेळी परिवर्तन होणार? की विखे पाटील गट पुन्हा गड राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
वार्षिक उलाढाल जवळपास दिडशे कोटी रूपये तसेच वार्षिक नफा 4 कोटी रुपयांपर्यंत आणि 75 कोटी रूपयांच्या ठेवी असलेल्या तसेच 1600 हून अधिक सभासद 200 कर्मचारी संख्येच्या शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणूकीचा बिगूल वाजला आहे. या निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी 11 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे.
या कर्माचारी सोसायटीत गेल्या निवडणूकीत विखे पाटील गटा विरोधात विठ्ठल पवार यांच्या गटाला 11 पैकी 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी विठ्ठल पवार यांच्या परीवर्तन विकास मंडळाला कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपचे विवेक कोल्हे यांचे पाठबळ मिळणार असल्याचं चित्र आहे.
विखे पाटलांची सत्ता असलेल्या गणेशनगर सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळवल्यानंतर थोरात – कोल्हे गटाने अनेक ग्रामपंचायतीत देखील विखेंना शह दिला. आता साईमंदिर कर्मचारी सोसायटीत देखील परीवर्तन होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साई संस्थान कर्माचारी सोसायटीची खुप मोठी उलाढाल आहे. साई मंदिर परिसरातील प्रसाद, चहा कँटीन, मोबाइल लॉकर या सुविधा सेसायटीच्या मार्फत सशुल्क पुरवल्या जातात. तर कर्मचा-यांच्या मुदत ठेवी कर्ज प्रकरणे या सोसायटीच्या माध्यमातून होतात.
या सोसायटीच्या निवडणुकीचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा निवडणूकीवर प्रभाव टाकणारा असल्याने पुन्हा एकदा विखे पाटील विरोधात थोरात – कोल्हे या दोन पॅनलमध्ये निवडणूक होणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. विखेंचा वरचष्मा असणा-या या संस्थेत आता थोरात – कोल्हे पॅटर्नचा उदय होणार का ? याकडे अवघ्या मतदारसंघाच लक्ष लागले आहे.
Web Title: Shirdi sai baba Sansthan Karmchari Society election
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App