Home अहमदनगर या तालुक्यात न्यायालयीन कोठडीतील कैद्यांमध्ये मारहाण

या तालुक्यात न्यायालयीन कोठडीतील कैद्यांमध्ये मारहाण

Shrirampur Beatings among inmates in judicial cells

श्रीरामपूर | Shrirampur: श्रीरामपूर कारागृहामधील न्यायालयीन कोठडीत असलेल्या तीन कैद्यांनी एकास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. याबाबत तीन कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांच्या बराकीत हा मारहाणीचा प्रकार घडला. रात्री आलेल्या जेवणात भाजी घेण्यावरून तीन कैद्यांनी एका कैद्याशी भांडण केले. त्याला पाणी पिण्याच्या भांड्याने मारहाण केली. तिघा जणांच्या आधी जेवण घेतल्याने आलेल्या रागातून ही हाणामारी झाली.

याप्रकरणी जखमी संदीप कांबळे याने फिर्याद दिली असून पोलिसांनी अक्षय गांगुर्डे, किरण चिकणे, सधीर सरकाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व फिर्यादी हे अट्टल गुन्हेगार आहे.

Web Title: Shrirampur Beatings among inmates in judicial cells

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here