Home अहमदनगर श्रीरामपूर परिसरातून तीन मुली पळवून नेल्याने खळबळ

श्रीरामपूर परिसरातून तीन मुली पळवून नेल्याने खळबळ

Shrirampur News (abduction) अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा गुन्हा तालुका पोलिसांत दाखल.

Shrirampur to the abduction of three girls

श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातून एका १७ वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याची तक्रार तर राहता तालुक्यातील जळगाव येथून दोन अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शहर व तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद दाखल करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहरातील बोरावके कॉलेज जवळून साडे सतरा वर्षांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने शहर पोलिसात दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार श्री. हापसे तपास करीत आहेत.जळगाव (ता. राहाता) येथील आईच्या फिर्यादीवरून साडे सतरा वर्षांच्या मुलीला सकाळी 10.30 वा. अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा गुन्हा तालुका पोलिसांत दाखल झाला आहे. तसेच जळगाव येथूनच दुपारी 1 वाजता साडे सोळा वर्षांच्या मुलीला एका तरुणाने पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी श्रीरामपूर तालुका पोलिसांत दिली आहे.

पोलीस निरीक्षक श्री. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. निकम अधिक तपास करीत आहेत. या घटनांनी पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Shrirampur to the abduction of three girls

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here