शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख स्मिता आष्टेकर यांना अटक
Ahmednagar News: शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख स्मिता आष्टेकर यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक (Arrested).
अहमदनगर: मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख स्मिता आष्टेकर यांना शुक्रवारी भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करून सायंकाळी सोडून देण्यात आले.
शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्याचे लोन नगरमध्येही पसरले आहे. सेनेतील बंडखोरी थांबवा, अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे फासू, असा इशारा अष्टेकर यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. दरम्यान, सेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे चिरंजीव नगरसेवक योगिराज गाडे हेही शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांसोबत होते. त्यामुळे जिल्हाप्रमुख गाडे यांनी समाधानकारक खुलासा न केल्यास त्यांनाही काळे फासण्याचा इशारा अष्टेकर यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील महिला पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ९ वाजता अष्टेकर यांना त्यांच्या शुल्केश्वर मंदिर परिसरातील घरातून अटक केली होती. त्यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले.
Web Title: Smita Ashtekar, former district head of Shiv Sena District Mahila Aghadi, arrested