Home महाराष्ट्र धक्कादायक! पोटच्या तीन वर्षांच्या मुलाला विकलं; त्याच पैशांतून बापाने मित्रांसोबच केली दारूची...

धक्कादायक! पोटच्या तीन वर्षांच्या मुलाला विकलं; त्याच पैशांतून बापाने मित्रांसोबच केली दारूची पार्टी

Breaking News | Crime: पोटच्या मुलाला बापाने चक्क दारूसाठी विकल्याची धक्कादायक घटना.

Sold the three-year-old boy

यवतमाळ:  यवतमाळ जिल्ह्यात धक्कादायक बापलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आर्णी तालुक्यातील तीन वर्षीय चिमुकल्या बाळाला जन्मदात्या बापाने दारूसाठी तेलंगणातील निर्मल येथे विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर वडिलांवर   गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलाच्या आईने या बाबत तक्रार दाखल केली होती. पती आणि पत्नीचे पटेनासे झाल्यामुळे ते दोघे मागील महिन्यापासून वेगळे राहत होते. त्यानंतर पीडित मुलगा हा आपल्या पित्यासोबत राहत होता. दरम्यान,  पोटच्या मुलाला बापाने चक्क दारूसाठी विकल्याची  धक्कादायक घटना उघडकीस आली.

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील तीन वर्षीय चिमुकल्या बाळाला जन्मदात्या बापानेच दारूसाठी तेलंगणातील निर्मल येथे विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी गुन्हा नोंद करत कोपरा गावातून वडीलांसह एकाला अटक केली. वडील श्रावण दादाराव देवकर (32 वर्षे) आणि चंद्रभान देवकर (65 वर्षे)  असे अटक करण्यात आलेला नाव आहे. तर कैलास लक्ष्मण गायकवाड (55) वर्ष रा. गांधी नगर आर्णी आणि बाल्या गोडांबे रा. महागाव कलगाव ता. दिग्रस असे दोघे फरार असून त्यांच शोध सुरू आहे.

आर्णी तालुक्यातील कोपरा गावातील पुष्पा देवकर(27) या गेल्या एक महिन्यापासून पती श्रावण याच्यापासून वेगळ्या राहत होत्या. त्यांना जय देवकर हा तीन वर्षांचा मुलगा असून तो वडील श्रावण देवकर यांच्यासोबत राहत आहे.  पती श्रावण आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या तीन वर्षांचा मुलगा जय याला आदिलाबाद, तेलंगणा येथे विकल्याची माहिती आई पुष्पाला मिळाली. या प्रकरणी पुष्पा देवकर यांनी आर्णी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता आर्णी पोलिसांनी श्रावण देवकर याच्यासह अन्य तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Sold the three-year-old boy

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here