Home महाराष्ट्र Rape | सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

Rape | सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

Sonia Gandhi's personal secretary rape Case

दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्याविरुद्ध दिल्लीत बलात्कार (Rape) आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २६ वर्षीय पिडीत महिलेने उत्तम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

नोकरी आणि लग्नाच्या बहाण्याने स्वीय सचिव पीपी माधवन यांच्यावर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. पिडीत महिला ही दलित समाजातील आहे. तिने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. महिलेचा पती कॉंग्रेस कार्यालयात होर्डींग्ज लावायचा. ज्यांचा २०२० मध्ये मृत्यू झाला आहे. फिर्यादीनुसार लग्न आणि नोकरीच्या बहाण्याने माधवनने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. २५ जून रोजी उत्तम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कलम ३७६ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Sonia Gandhi’s personal secretary rape Case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here