Home पुणे दहावीत मित्रांपेक्षा कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

दहावीत मित्रांपेक्षा कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Breaking News | Pune Suicide: मित्रांना जादा टक्के गुण मिळाले. मात्र, आपल्याला केवळ ७५ टक्के गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या.

Student commits suicide due to lack of qualities compared to his best friends

पिंपरी (पुणे) : दहावीच्या परीक्षेत मित्रांना जादा टक्के गुण मिळाले. मात्र, आपल्याला केवळ ७५ टक्के गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. चिंचवड येथे वाल्हेकरवाडीमध्ये गुरुवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. उमंग रमेश लोंढे (१६, रा. शिवले कॉलनी, चिंचवड), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमंग याचे वडील खासगी कंपनीत कामाला आहेत. आईदेखील नोकरी करते. चिंचवड येथील

शाळेतून उमंगने दहावीची परीक्षा दिली होती. उमंगच्या इतर मित्रांना ८० ते ९० टक्के गुण मिळाले. मात्र, आपल्याला केवळ ७५ टक्के गुण मिळाल्याने उमंग निराश झाला होता. गुरुवारी सकाळी त्याच्या आईला कामावर सोडण्यासाठी त्याचे वडील गेले होते. त्यावेळी घरात एकट्याच असलेल्या उमंगने ओढणीने गळफास घेतला.

Breaking News: Student commits suicide due to lack of qualities compared to his best friends

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here