Home महाराष्ट्र ब्रेकिंग: केंद्र सरकारचा साखर कारखान्यांना मोठा धक्का

ब्रेकिंग: केंद्र सरकारचा साखर कारखान्यांना मोठा धक्का

Sugar factory Central Government Decision:  या हंगामात साखर कारखान्यांना इथेनॉलचे उत्पादन घेता येणार नाही.

Sugar Factory Central Government Decision

मुंबई:  साखर कारखान्यांना आता केंद्र सरकारने मोठा धक्का दिला आहे. या हंगामात साखर कारखान्यांना इथेनॉलचे उत्पादन घेता येणार नाही. याबाबत केंद्र सरकारने एक नोटीफिकेशन जारी केले आहे. या हंगामात ऊसापासून इथनॉल बनवता येणार नाही. या वर्षी भारतीय बाजारपेठेत साखरेची कमतरता भरुन काढण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.

या वर्षी भारतात मान्सून कमी पाऊस बरसला आहे. याचा फटका ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामुळे ३१ ऑक्टोंबरपर्यंत भारत सरकारने साखर एक्सपोर्टवरही बंदी घातली होती. इथेनॉल बंदीमुळे भारतात साखरेचे उत्पादन वाढू शकते. यामुळे साखरेचा मुबलक साठा होईल. जर इथेनॉल बनवणे कायम ठेवले असते तर साखरेचे उत्पादन कमी झाले असते म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

या वर्षी देशभरात पाऊस कमी पडला असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी लागते, त्यामुळे या वर्षी कमी पाण्यामुळे कमी ऊस शेती केली आहे. यामुळे साखरेचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे ऊसाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने कारखान्यांना नोटीफिकेशन काढत मोठा झटका दिला आहे.

या नोटीफिकेशनमध्ये साखर कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन न घेता फक्त साखरेचे उत्पादन घेण्याची सूचना दिली आहे. ५ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रीव अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती, या बैठकीत महागाईबाबत चर्चा झाली. या बैठकीतच इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता यावर चर्चा झाल्यानंतर आता सरकारने कारखान्यांसाठी ही नोटीफिकेशन जारी केले आहे.

Web Title: Sugar Factory Central Government Decision

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here