Home अहमदनगर अहमदनगर: अत्याचार केलेल्या पिडीतेची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर: अत्याचार केलेल्या पिडीतेची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar Crime News:   विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराची घटना, विवाहितेला सासरी नांदविण्यास नकार, गुन्हा मागे घेण्यासाठी धमकी, त्यामुळे राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Suicide by hanging the abused victim

श्रीगोंदा:  सासर्‍यांनी नांदवण्यास नकार दिलेल्यानंतर माहेरी राहत असलेल्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार (abused) केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात घडली होती. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द अत्याचारा गुन्हा दाखल आहे.

दरम्यान अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडितेला धमकी दिल्याने तिने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी घडली आहे. पीडित विवाहितेच्या आईने या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडित विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय मारूती शिंदे, मंजुळाबाई मारूती शिंदे (दोघे रा. ढवळगाव ता. श्रीगोंदा), वैभव बबुशा पोटघन, रेखाबाई बबुशा पोटघन (दोघे रा. राजापूर ता. श्रीगोंदा), दादा वाळुंज, अनिल गौतम वाळुंज, गौतम वाळुंज, गणेश गौतम पानमंद (सर्व रा. ढवळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी यांच्या मुलीला सासरचे लोक नांदवत नसल्याने ती फिर्यादी यांच्याकडे राहत होती. दरम्यान वैभव  पोटघन राने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जुलै 2022 ते 27 डिसेंबर, 2022 दरम्रान वेळोवेळी अत्यावर केला होता. तसेच काढलेले फोटो लोकांना दाखविण, अशी धमकी दिली होती. याबाबत बेलंवडी पोलीस ठाण्यात वैभव बबुशा पोटघन याच्याविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून फिर्यादी यांची मुलगी मानसिक तणावात होती. तणावात असल्याने तिने राहत्या घरात गळफास घेऊन गुरूवार, (दि.19) आत्महत्या केली. घरातील बेडवर एक वही मिळून आली आहे. त्यात दोन पानावर आत्म्हत्रेला जबाबदार असणार्‍या व्यक्तीविषयी मजकुर आढळून आला आहे. त्यात त्रास देणार्‍या वरील आठ लोकांचा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहेत.

Web Title: Suicide by hanging the abused victim

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here