Home श्रीरामपूर अहमदनगर: तरुणीची आत्महत्या, पोलिसांवर गुन्हा

अहमदनगर: तरुणीची आत्महत्या, पोलिसांवर गुन्हा

Breaking News | Ahmednagar: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याने पढेगाव येथील तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide).

Suicide of a young woman, a crime against the police

श्रीरामपूर : लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याने पढेगाव येथील तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेस दोषी पोलिस अधिकाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पढेगाव येथील तरुणी पिंपरी चिंचवड येथे नर्स म्हणून काम करत होती. ती होस्टेलमध्ये राहत होती. कुटुंबीयांनी तिला लग्नाबाबत विचारणा केली. मात्र तिने एका मुलासोबत प्रेम आहे. तो नोकरी करत असून आम्ही लग्न करणार आहोत, असे सांगितले. तरुणी ८ फेब्रुवारी रोजी पढेगाव येथे घरी आली होती. ती सतत बडबड करत होती. त्यामुळे मनोरुग्ण डॉक्टरांकडे तिला नेले जाणार होते. मात्र तत्पूर्वीच पहाटे घरातून गायब झाली. तिचा मृतदेह शेजारील विहिरीत आढळून आला.

तरुणीच्या पिंपरी चिंचवड येथील खोलीची झडती घेतली असता बॅग मिळून आली. त्यात तरुणीच्या हस्ताक्षरातील मजकूर कुटुंबीयांना मिळून आला. त्यात पीएसआय मनीष मोगरे (अकोला) याच्याशी लग्न करणार असल्याची बाब तिने नमूद केली होती. मोबाइलवरील दोघांचे संभाषण पाहण्यात आले. मोगरे याने मात्र तरुणीशी नंतर संपर्क तोडला. पोलिस गजानन थाटे व मनीष याला माफ करू नका, असे तिने लिहिले होते. आत्महत्येस कारणीभूत असलेले मोगरे व थाटे यांच्यावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Suicide of a young woman, a crime against the police

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here