Home अहमदनगर अहमदनगर: शेततळ्यात पडून शिक्षिकेचा मृत्यू

अहमदनगर: शेततळ्यात पडून शिक्षिकेचा मृत्यू

Pathardi News | पाथर्डी: फिरण्यासाठी गेले असता शेततळ्यात पडल्याने शिक्षिकेचा (Teacher) मृत्यू.

Teacher dies after falling in farm

पाथर्डी: तालुक्यातील निवडूंगे येथील शेततळ्यात पडून एका शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. मनीषा महादेव मरकड असे मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे.  

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत मनीषा मरकड ह्या नेहमीप्रमाणे निवडुंगे गावाजवळ असलेल्या परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या. या परिसरात असलेल्या एका शेततळ्यात पाय घसरून पडून त्यांचा शुक्रवारी (दि.8) दुर्दैवी मृत्यू झाला.

संध्याकाळी उशिरा त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मयत मनिषा मरकड ह्या मराठा विद्या प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी विद्यालय येळी येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्नालयात शवविच्छेदन केल्या नंतर त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Teacher dies after falling in farm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here