Home महाराष्ट्र तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला: एसटी व कारचा भीषण अपघात, पाच ठार

तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला: एसटी व कारचा भीषण अपघात, पाच ठार

Latur Accident:  पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर कुत्र्यांना वाचवताना चालकाने कार वळवली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन धडकून भीषण अपघात.

Terrible accident of ST and car, five killed

लातूर : तुळजापुरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लातूर उदगीर रस्त्यावर हैबतपूर पेट्रोल पंपाजवळ कार व एसटी महामंडळाच्या बसमध्ये भीषण अपघात (Accident) झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात कारमधीलं पाचजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

उदगीर येथून कुटुंब कारने (MH 24 AB0 4080) सकाळी ८.३० च्या सुमारास निघाले होते. कारमधून सहाजण तुळजापुरला दर्शनासाठी निघाले होते. लातूर उदगीर रस्त्यावर हैबतपुर जवळील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर कुत्र्यांना वाचवताना चालकाने कार वळवली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन धडकली.

अपघातानंतर पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. अलोक तानाजी खेडकर, कोमल व्यंकट कोदरे, अमोल जीवनराव देवकते, यशोमती देशमुख व चालक नागेश ज्ञानेश्वर गुंडेकर अशी त्यांची नावं आहेत. तर प्रियांका गजानन बनसोडे गंभीर जखमी आहे. सर्व मृतदेह उदगीर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहेत. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Terrible accident of ST and car, five killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here