Home क्राईम संगमनेरात शोरूमचे गोडावून फोडून तीन नव्या मोटारसायकलींची चोरी

संगमनेरात शोरूमचे गोडावून फोडून तीन नव्या मोटारसायकलींची चोरी

Sangamner News: समनापूर ते सुकेवाडी रोडलगत असलेले गांधी मोटर्स टीव्हीएस शोरूमचे पत्र्याचे गोडावून फोडून अज्ञात चोरट्यांनी एकूण 2 लाख 64 हजार 485 रुपयांच्या 3 मोटारसायकली चोरून (theft) नेल्याची घटना.

Theft of three new motorcycles by breaking into a showroom in Sangamner

संगमनेर: शहरातील चोरीचे सत्र सुरु आहे अशातच शहरापासून काही अंतरावरील समनापूर ते सुकेवाडी रोडलगत असलेले गांधी मोटर्स टीव्हीएस शोरूमचे पत्र्याचे गोडावून फोडून अज्ञात चोरट्यांनी एकूण 2 लाख 64 हजार 485 रुपयांच्या 3 मोटारसायकली चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, समनापूर ते सुकेवाडी रोडलगतच गांधी मोटर्स टीव्हीएसचे शोरूम आहे. गुरुवार दि. 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान शोरूम बंद करून सर्वजण गेले होते. त्यानंतर पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शोरूमच्या पत्र्याच्या गोडावूनचा पत्रा उचकटवून आतमध्ये प्रवेश केला आणि 2 लाख 64 हजार 485 रुपयांच्या तीन नवीन मोटारसायकली चोरून पसार झाले आहेत.

याप्रकरणी शोरूमचे मॅनेजर विजय सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 379/ 2023 भारतीय दंड संहिता कलम 461, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित महाजन करीत आहे.

Web Title: Theft of three new motorcycles by breaking into a showroom in Sangamner

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here