Home अहमदनगर Theft: अहमदनगर:  पतसंस्थेसह सात दुकाने फोडली

Theft: अहमदनगर:  पतसंस्थेसह सात दुकाने फोडली

Theft Seven shops including Patsanstha were blown up

Ahmednagar | Shrigonda | श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे बुधवारी रात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. चोरट्यांनी एका पतसंस्थेसह सात दुकाने फोडल्याची (Theft) घटना घडली आहे.  यामध्ये पतसंस्थेतील ९५ हजार ४३६ रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.  याबाबत शंकर आनंदा जाधव यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बुधवारी रात्री चोरट्यांनी काष्टी येथील विजय रंधवे यांचे दुकान फोडले. येथील मातोश्री हॉस्पिटल शेजारी मेडिकल. वसंतराव मोरे यांचे साई सुपर शॉपी, संदीप जाधव यांचे साई ट्रेडर्स चोरांनी फोडले.  कळसकर यांचे सिद्धिविनायक कॉम्पुटर, अनिल दातार यांचे दत्त पेंटरस, सुनील काळे यांचे एस. के. अग्रो सर्विसेस हे दुकाने फोडली. या दुकानामध्ये किती रक्कम चोरीस गेला याची माहिती मिळू शकली नाही.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, उप निरीक्षक आमित माळी यांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Theft Seven shops including Patsanstha were blown up

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here