संगमनेर: जमिनीचा खटला मागे घेण्यासाठी धमकी व मारहाण
Breaking News | Sangamner: न्यायालयात सुरू असलेला जमिनीचा खटला मागे घेण्यासाठी एका जणाला तंगडे तोडून टाकू, अशी धमकी देऊन मारहाण झाल्याची घटना.
संगमनेर : न्यायालयात सुरू असलेला जमिनीचा खटला मागे घेण्यासाठी एका जणाला तंगडे तोडून टाकू, अशी धमकी देऊन मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील खांडगाव परिसरात रविवारी घडली. याप्रकरणी संगमनेरचे माजी उपनगराध्यक्ष विवेक कासार यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, खांडगाव येथील लक्ष्मण त्र्यंबक गुंजाळ व त्यांचा चुलत भाऊ संजय निवृत्ती गुंजाळ यांच्यामध्ये जमिनीच्या कारणावरुन न्यायालयात खटला चालू आहे. आठ दिवसांपूर्वी लक्ष्मण गुंजाळ हे घरी असताना त्यांचा चुलत मेहुणा संगमनेरचा माजी उपनगराध्यक्ष विवेक कासार (रा. मालदाड रोड संगमनेर) व संजय निवृत्ती गुंजाळ (रा. खांडगाव) या दोघांनी लक्ष्मण गुंजाळ यांच्या घरी येऊन “खटला मागे घे नाहीतर तुझ्या तंगड्या तोडून टाकील,” अशी धमकी दिली होती. दिनांक १ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गुंजाळ हे आपल्या दुचाकीवरून खांडगाव जात होते. बायपास येथून घरी यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने गुंजाळ यांना मारहाण केली. विवेक कासार व संजय गुंजाळ यांनी आमच्या नादी लागला तर तुला संपवून टाकीन, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन मोटारसायकलवरुन नाशिकच्या दिशेने निघून गेले. याबाबत लक्ष्मण त्र्यंबक गुंजाळ यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विवेक विठ्ठल कासार, संजय निवृत्ती गुंजाळ यांच्यासह आणखी दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Breaking News: Threats and beatings to withdraw land case