Home क्राईम संगमनेर: गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तिघांना अटक

संगमनेर: गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तिघांना अटक

Sangamner Crime: गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह संगमनेर तालुक्यातील पठार भागात फिरणाऱ्या घारगाव पोलिसांनी सापळा रचून पकडण्यात आले.

Three people who were walking around the village with katta were arrested

संगमनेर: गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह संगमनेर तालुक्यातील पठार भागात फिरणाऱ्या घारगाव पोलिसांनी सापळा रचून पकडण्यात आले असून या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

संतोष काशिनाथ कुटे (वय ३२, रा. मांडवे बुद्रुक, तालुका संगमनेर), शिवाजी बाबुराव कुदनर (वय २७ राहणार शिंदोडी, तालुका संगमनेर), संतोष शिवराज बर्डे (वय २८, राहणार शिंदोडी तालुका संगमनेर) असे अटक केलेल्या तिघांचे नावे आहेत.  पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी संगमनेर घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली की, गावठी कट्टा कमरेला बांधून तिघेहीजण संग्राम हॉटेल, साकुर ते टाकळी ढोकेश्वर रोडवर मांढरे मांडवे बुद्रुक शिवार परिसरात बसलेले असल्याची माहिती मिळाली.

खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे आणि पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद अशोक गाडेकर व फलीस नाईक चौधरी असे खाजगी वाहनांवर त्या ठिकाणी पोहोचले सायंकाळी सापळा रचून या तिघांना छापा टाकून पकडले असता त्यातील संतोष काशिनाथ कुटे याच्या कमरेच्या डाव्या बाजूला एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आढळून आला. तर शिवाजी बाबुराव कुदनर याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात तीन जिवंत काडतुसे मॅक्झिनसह मिळून आले तसेच संतोष शिवराज बर्डे याची अंगझडती घेऊन विचारपूस केली असता तो शिवाजी कुदनरच्या सोबत आला असल्याची माहिती समजली

सदर गावठी कट्टा व जिवंत काडतुसे रणजीत बापू धुळगंड (राहणार मांडवे बुद्रुक, तालुका संगमनेर) याच्याकडून खरेदी केली असल्याचे शिवाजी कुदनर याने पोलिसांना सांगितले. या शस्त्रांचा पंचनामा करण्यात आला आहे.

घारगाव पोलीसांनी २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि २ हजार ३०० रुपये किमतीचे तीन जिवंत काडतुसांसह मॅक्झिन जप्त केले आहे काडतुसांच्या पाठीमागील बाजूस के एफ 7 65 असे लिहिलेले आहे. तर गावठी बनावटीचा कट्टा पांढऱ्या धातूच्या पिस्तूल प्रकारातला असून त्यावर दोन्ही बाजूने काळसर रंगाची प्लास्टिकची मूठ बसवलेली आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद अशोक गाडेकर यांनी फिर्याद दिली असून वरील तिघांविरुद्ध भारतीय हत्यारे कायदा कलम ३/२५ ५७ याच्यासह ३७ (१) (३) चे उल्लंघन १२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहे. 

Web Title: Three people who were walking around the village with katta were arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here