Home अहिल्यानगर अहिल्यानगर: गॅस टाकीचा मोठा स्फोट होऊन दोन जण जखमी

अहिल्यानगर: गॅस टाकीचा मोठा स्फोट होऊन दोन जण जखमी

Breaking News | Ahilyanagar: गॅस टाकीचा मोठा स्फोट होऊन दोन जण जखमी झाले. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या व भिंतींना तडे गेले तर एका दुकानाचे शटर वीस फुटांवर जाऊन पडले.

Two injured in major gas explosion

शेवगाव: शहरातील पंचायत समिती रोडवरील शिववंदना इमारतीत शनिवारी सकाळी 8.30 वाजेदरम्यान गॅस टाकीचा मोठा स्फोट होऊन दोन जण जखमी झाले. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या व भिंतींना तडे गेले तर एका दुकानाचे शटर वीस फुटांवर जाऊन पडले. पंचायत समिती रोडवरील इमारतीत काही दुकाने आहेत. पहिल्या मजल्यावर इमारतीचे मालक शिवाजी शेळके राहतात. शनिवारी सकाळी गॅस टाकी स्फोटाच्या आवाजाने शेळके यांच्या कुटुंबातील सदस्य खाली पळत आले. समोरील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला.

स्फोटाचा आवाज घुमल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर धावले. स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात हलविले. शिवाजी शेळके यांचा मुलगा समर्थ शेळके व आणखी एक युवक जखमी झाले. त्यांच्यावर शेवगाव येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. स्फोटाच्या हादर्‍याने समर्थ इलेक्ट्रीकल्समधील विक्रीसाठी ठेवलेल्या गॅस शेगड्या, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक व अन्य साहित्याचे नुकसान झाले. दुकानाशेजारील मोरया मेडिकलचे लोखंडी शटर वीस फुट लांब जाऊन पडले व समोरील काचांचा चुरा झाला.

घटनास्थळी शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथकासह धाव घेतली. शहरातील गॅस गोदामे व रिपेअरिंग दुकाने वस्तीपासून दूर हलविण्याची गरज आहे. तातडीने नियमावली करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी दिली.

Breaking News: Two injured in major gas explosion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here