Home अहिल्यानगर अहिल्यानगर: भाच्याच्या मारहाणीत मामाचा मृत्यू; आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी

अहिल्यानगर: भाच्याच्या मारहाणीत मामाचा मृत्यू; आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी

Breaking News | Ahilyanagar Crime: जुन्या भांडणातून दारूच्या नशेत भाच्याने केलेल्या मारहाणीत चुलत मामाचा मृत्यू झाल्याची घटना.

Uncle dies after being beaten by nephew

अहिल्यानगर: जुन्या भांडणातून दारूच्या नशेत भाच्याने केलेल्या मारहाणीत चुलत मामाचामृत्यू झाला. जवळा (ता. पारनेर) येथे शनिवारी ही घटना घडली. गोरख विठ्ठल गोरे (वय ६०, रा. जवळा (कुंभार गल्ली) असे मृताचे नाव आहे. याबाबत अनिल सुदाम गोरे (वय २८, रा. जवळा) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी भाऊसाहेब बबन दरेकर (वय ४४, रा. जवळा (कुंभार गल्ली) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पारनेर पोलिसांनी १८ ऑक्टोबर रोजी आरोपीस ताब्यात घेतले असून सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपी भाऊसाहेब दरेकर व गोरख गोरे यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. जुन्या भांडणातूनच शनिवारी आरोपी भाऊसाहेब दरेकर याने मामा गोरख गोरे यांना लाथा-बुक्क्यांनी, तसेच काठीने मारहाण केली. फिर्यादी अनिल गोरे याने आरोपीच्या तावडीतून गोरे यांची सुटका केली. त्यांच्या घरी नेऊन सोडले. काही वेळाने आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन ‘तुम्ही गोरखच्या सरपणाची तयारी ठेवा, मी त्याला मारून टाकणार आहे’, अशी धमकी दिली. त्यावर गोरख मोरे घरातून बाहेर न आल्याने त्यांना पाहण्यासाठी फिर्यादी गेले असता, मृतावस्थेत ते आढळून आले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

मामा-भाचे यांच्यात दोन दिवसांपूर्वीच जोरदार भांडणे झाली होती. नातेवाइकांनी त्यात मध्यस्थी केली होती. जुन्या भांडणाचा राग मनात धरून १८ ऑक्टोबर रोजी भाऊसाहेब दरेकर याने केलेल्या मारहाणीत सख्खा चुलत मामा गोरख गोरे यांचा मृत्यू झाला.

दारूच्या नशेत लहान बाळाला उचलू नको, असे सांगितल्याच्या रागातून दोघांनी वृद्धास मारहाण केली. त्यात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

Breaking News: Uncle dies after being beaten by nephew

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here