Home महाराष्ट्र Weather Update: मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update: मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update:  मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस येऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.

Weather Update unseasonal rain in Madhya Maharashtra

मुंबई: गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात थंडीची लाट कमी झाली आहे. तापमानात ५ अंशाने वाढ झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. अशात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस येऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

काल अवकाळी पावसाने नंदुरबार जिल्ह्यात हजेरी लावली. नागपुर तालुक्यातील काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. तसेच खांडबारा आठवडे बाजारात यामुळे काल नागरिकांची मोठी धांदळ उडाली होती. मराठवाडा आणि विदर्भात थंडी जास्त प्रमाणात होती. याचा परिणाम येथील शेतीवर झाला. अशात आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतीवर याचा परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

रब्बी पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान होऊ शकते. बऱ्याच ठिकाणी कांद्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र कडाक्याच्या थंडीने कांद्यावर करपा रोग पसरल्याचं दिसत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास गहू, हरभरा आणि मका अशा पिकांना याचा जास्त धोका आहे. पावसाने या पिकांची नासाडी होऊ शकते. यामुळे बळीराजा चिंतेत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, थंडीची लाट २ फ्रेब्रुवारीपर्यंत जाणवेल. तसेच पुढचे ४ ते ५ दिवस अवकाळी पाऊसही होऊ शकतो.

Web Title: Weather Update unseasonal rain in Madhya Maharashtra

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here