Home कोल्हापूर धक्कादायक! मुलींना वशमध्ये करण्यासाठी जादुटोणा; फोटोवर हळद,कुंकू लावत टोचल्या टाचण्या

धक्कादायक! मुलींना वशमध्ये करण्यासाठी जादुटोणा; फोटोवर हळद,कुंकू लावत टोचल्या टाचण्या

मुलींवर करणी करण्याचा प्रयत्न, अज्ञात ठिकाणी मुलींचा होकार मिळवण्यासाठी उतारा ठेवल्याचे आढळून आले.

witchcraft to tame girls Heels pierced by applying turmeric and kumkum on the photo

कोल्हापूर: पुरोगामी विचारांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. एका अज्ञात ठिकाणी मुलींचा होकार मिळवण्यासाठी उतारा ठेवल्याचे आढळून आले आहे. यात मुलींच्या फोटोवर हळद, कुंकू, लिंबू, हिरवे कापड आणि मुलींचे फोटो ठेवण्यात आले आहेत. या घटनेमुळे कोल्हापूरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  हा अघोरी प्रकार कोल्हापूरमधील (Kolhapur) पाडळी खुर्द गावाच्या हद्दीत घटला आहे. सदर गावातील मुली या घटनेने भयभीत झाल्या आहेत. गावकरी देखील मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहेत. या गावातील सर्व व्यक्तींनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे. यासह गावातील काही व्यक्तींनी आळीपाळीने गावाला रात्री पाहारा द्यायचे ठरवले आहे.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

गावातील मुलींवर कोणीतरी करणी करण्याचा प्रयत्न करत असल्याने गावात मुलींना घराबाहेर पडण्यास भीती वाटत आहे. या घटनेमध्ये मुलींच्या फोटोजवळ खन, फळे, अगरबत्ती, हळद कुंकू, फुले, तसेच हिरवी साडी यांच्यासह लिंबूला टाचण्या टोचून ठेवण्यात आला आहे. मात्र ही केवळ अंधश्रद्धा असून कोणत्याही मुलीने किंवा तिच्या कुटुंबीयांनी घाबरून जाऊ नये असे ग्रामस्थ म्हणत आहेत. या प्रकरणी लवकरच पोलीस कारवाई करणार आहेत.

Web Title: witchcraft to tame girls Heels pierced by applying turmeric and kumkum on the photo

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here