Home क्राईम सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलालास अटक

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलालास अटक

Thane Sex racket:  पैशांचे प्रलोभन दाखवून महिलेकडून शरीरविक्रय व्यवसाय करून घेणाऱ्या मुंबईतील मालाडमधील २२ वर्षीय महिला दलालास अटक.

woman broker who ran a sex racket was arrested

ठाणे : पैशांचे प्रलोभन दाखवून महिलेकडून शरीरविक्रय व्यवसाय करून घेणाऱ्या मुंबईतील मालाडमधील २२ वर्षीय महिला दलालास अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक’ प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दिली. या महिलेच्या तावडीतून ४१ वर्षीय पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे..

कोपरीतील आनंद टॉकीजजवळ महिला तिच्या मुकुंद नामक साथीदारासह सेक्स रॅकेट चालवीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना मिळाली होती. त्याआधारे पथकाने ९ मार्चला सापळा लावला. बनावट गि-हाईक पाठविल्यानंतर काही रुपयांमध्ये महिलेला शरीरविक्रय करण्यासाठी त्या ठिकाणी आणण्यात आले होते.

या गि-हाईकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी छापा मारून दलाल महिलेला अटक केली. तिच्याकडून एक हजार रुपये, मोबाइल आणि इतर सामग्री असा सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी महिलेच्या साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले,

Web Title: woman broker who ran a sex racket was arrested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here