Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: भाऊ व भाच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

अहमदनगर ब्रेकिंग: भाऊ व भाच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

Ahmednagar News: दोघे भाऊ व दोन भाच्यांनी बहिणीला मारहाण केल्याने तिने त्यांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

woman commits suicide after suffering from her brother and nephew

नेवासा | Nevasa: दोघे भाऊ व दोन भाच्यांनी बहिणीला मारहाण केल्याने तिने त्यांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पाचुंदा येथे घडली. याबाबत दाखल झालेल्या फिर्यादीवरुन चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत काशीनाथ नामदेव वाघमोडे (वय 60 धंदा शेती रा. पाचुंदा ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी पाचुंदा येथे दोन मुलांसह राहून शेती व्यवसाय करुन उपजिवीका भागवितो माझा लहान मुलगा अभिजीत याचे लग्न त्याचा मामा गंगाधर लहानू कोकरे यांची मुलगी लंकाबाई हिच्यासोबत झालेले असून माझी सून लंकाबाई ही मागील दोन महिन्यापासून तिच्या माहेरी राहत आहे. मला दोन मेव्हणे मिताजी लहानू कोकरे व गंगाधर लहानू कोकरे तसेच दोन भाचे राधाकिसन फुलाजी कोकरे व सदाशिव गंगाधर कोकरे सर्व रा. पाचुंदा असे आहेत.

20 मार्च रोजी दुपारी अडीच ते चार वाजण्याच्या सुमारास मिताजी लहानू कोकरे, गंगाधर लहानू कोकरे, राधाकिसन फुलाजी कोकरे व सदाशिव गंगाधर कोकरे यांनी आमचे बैल आमच्या वस्तीवर आले. ‘तुम्ही वगारी का विकल्या?’ असे म्हणून आम्ही तुमचे बैल नेणार असे ते म्हणाले. आम्ही त्यांना बैल नेण्यास विरोध केला असता त्यांनी मला व माझा मुलगा अभिजीत असे आम्हाला दोघांना हाताने मारहाण करुन आमच्या मालकीचे दोन बैल सोडून घेवून गेले.

आम्ही त्यांच्या पाठीमागे गेलो नाही परंतु माझी पत्नी आशाबाई काशीनाथ वाघमोडे (वय 50) ही त्यांच्या पाठीमागे माका शिवार ता. नेवासा येथे असलेल्या शेतामध्ये गेली. त्यावेळी वरील चौघांनी माझ्या पत्नीला मारहाण करुन तिच्या उजव्या पायाचे जोडवे घातलेल्या बोटाला गंभीर जखम केली व तिने त्यांच्या या त्रासाला कंटाळून तेथे जवळ असलेले कसले तरी विषारी औषध पिवून आत्महत्या केली. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी  गुन्हा रजिस्टर नं. फर्स्ट 346/2023 भारतीय दंड विधान कलम 306, 324, 323 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: woman commits suicide after suffering from her brother and nephew

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here